Devendra Fadanvis Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadanvis : त्यांना पक्ष चालविणे कठीण असल्याने विलीनीकरणाचा निर्णय; देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना टोला

Dhule News : माध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष लवकरच विलीन होतील या केलेल्या सूचक वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली

भूषण अहिरे

धुळे : शरद पवार यांना पक्ष पुढे चालवता येणे शक्य नसल्यामुळे त्यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण (Dhule) करण्याचा निर्णय घेतला असेल. यापूर्वी देखील त्यांनी असे कित्येक वेळा पक्ष तयार केला व काँग्रेसमध्ये विलीन केला आहे; असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शरद पवार यांच्या सूचक वक्तव्यावर टोला लगावला आहे. 

धुळे येथे महायुतीच्या सभेसाठी देवेंद्र फडणवीस आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधत (Sharad Pawar) शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये (Congress) प्रादेशिक पक्ष लवकरच विलीन होतील या केलेल्या सूचक वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा महायुतीला मिळतील; असा विश्वास देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. नंदुरबार येथील (BJP) भाजपच्या उमेदवार हिना गावित व धुळ्याचे भाजपचे लोकसभेचे उमेदवार सुभाष भामरे हे नक्की विजयी होतील; असा विश्वास देखील  फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईतील मराठी माणूस ठाकरेंच्या नेतृत्वात निर्वासित
मुंबईमधील मराठी माणसाला जर कोणी निर्वासित केले असेल, तर ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मराठी माणसाच्या निर्वासावर बोलताना भाजपवर साधलेल्या निशाण्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसपाठोपाठ भाजपही घेणार पक्षाच्या कामगिरीचा आढावा

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २'चं शूटिंग थांबवले अन् रिलीज डेटही पुढे ढकलली, कारण काय?

Divorce: घटस्फोटानंतर दुग्धाभिषेक, केक कापला; जंगी सेलिब्रेशन करणारा तरुण आहे तरी कोण?

Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

SCROLL FOR NEXT