थर्टीफर्स्ट  
महाराष्ट्र

थर्टीफर्स्ट पार्श्वभूमीवर नॉनव्हेज दुकानांवर उसळली गर्दी

थर्टीफर्स्ट पार्श्वभूमीवर नॉनव्हेज दुकानांवर उसळली गर्दी

भूषण अहिरे

धुळे : नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सगळेच सज्ज आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंधने असली तरी घरच्या घरी सेलिब्रेशनचे बेत आखले जात आहेत. कुठे ओली तर कुठे सुकी पार्टीचे नियोजन आखले गेले आहे. यासाठी सारेच सज्‍ज (New Year Celebration) झाले असून, रात्रीचा बेत करण्यासाठी नॉनव्‍हेजच्‍या दुकानांवर गर्दी पाहण्यास मिळत आहे. (dhule news Crowds thronged the nonveg shops on the Thirty first celebration)

मार्गशीर्ष महिना असल्‍याने महिलांचे उपवास आहेत. मार्गशीर्ष महिन्‍याचा शेवटचा गुरूवार ३० डिसेंबरला झाला; यामुळे महिलांचे उपवास संपले आहेत. तरी देखील या महिन्‍याचे दोन दिवस बाकी असल्‍याने मांसाहार पार्टीवर अनेकांना निर्बंध आले आहेत. यामुळेच शाकाहाराचा प्लान करण्यावर भर दिला जात आहे.

तरीही दुकानांवर गर्दी

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील (Dhule) चिकन व मटणच्या दुकानावर नॉनव्हेज खवय्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात उसळलेली बघावयास मिळत आहे. इतर दिवसांच्या तुलनेत आज चिकन व मटणच्या दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील ग्राहक आज चिकन व मटणवर ताव मारण्यासाठी या दुकानांवर गर्दी करताना दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT