महाराष्ट्र

धुळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; बारा तोळे सोन्‍याचे दागिने लंपास

धुळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; बारा तोळे सोन्‍याचे दागिने लंपास

भूषण अहिरे

धुळे : शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचे दिसून येत आहे. यातच शहरातील खंडेरावनगर परिसरात चोरट्यांनी घरात कुणी नसल्याचा फायदा उचलत दाराचा कडी कोंडे तोडून १२ तोळे सोने चोरून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. (dhule-news-crime-news-family-hospital-and-house-robbery)

धुळे शहरातील खंडेरावनगर परिसरातील सुनील वाकडे यांच्या घरामध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी करत सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. सुनील वाकडे यांच्या मुलीला प्रसूती कळा येत असल्यामुळे त्यांना तात्काळ घरच्यांनी दवाखान्यामध्ये नेले. घर बंद करून सर्वजण रूग्‍णालयात होते. घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी संधीचा फायदा उचलला. चोरट्यांनी घरामध्ये कोणीही नसल्याचे बघत घरातील तब्बल बारा तोळे सोने त्याचबरोबर चांदीचे दागिने चोरून पोबारा केला आहे.

पोलिसांकडून पंचनामा

घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पथकासह फिंगरप्रिंट एक्सपर्टच्या मदतीने चोरीचा तपास शहर पोलिसांतर्फे सुरू करण्यात आला असून लवकरच या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात यश येईल असे मत पोलिस प्रशासनातर्फे व्यक्त केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT