अत्‍याचार 
महाराष्ट्र

संतापजनक..वृद्धाकडून अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार

संतापजनक..वृद्धाकडून अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार

साम टिव्ही ब्युरो

धुळे : मोहाडी उपनगर येथील एका ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी वृद्ध संशयिताला ताब्यात घेतले आहे. (dhule-news-crime-news-abuse-of-a-minor-girl-in-old-man)

मोहाडी उपनगर येथील ११ वर्षीय मुलगी २ नोव्हेंबरला दुपारी एकला बोकडासाठी चारा घेऊन येते, असे सांगून घरातून बाहेर पडली. यावेळी संशयित शांताराम शिवराम अहिरे (वय ७१) याने रेल्वे पट्ट्याजवळ चारा तोडून देण्याचे आमिष दाखवत मुलीला सायकलीवर बसवून सावळदे (ता. धुळे) शिवारातील शेतात नेले. तेथे त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास पीडितेसह तिच्या आई- वडिलांना मारून टाकण्याची त्याने धमकी दिली. पीडित मुलगी घाबरून गेल्याने तिने घटनेबाबत वाच्यता केली नाही.

पोटात दुखू लागल्‍याने प्रकार उघड

दरम्यान, तिच्या पोटात दुखू लागल्याने सोमवारी तिने तिच्या आईला घटनेबाबत सांगितले. त्यानंतर तिच्या आईने सासूशी चर्चा केल्यानंतर सोमवारी (ता. ८) रात्री उशिरा मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात संशयित शांताराम अहिरे याच्याविरुद्ध पोक्सोसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिस उपअधीक्षक दिनकर पिंगळे, निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक एम. आय. मिर्झा यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयिताला पोलिसांनी मंगळवारी (ता. ९) ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा, यासाठी कळव्यात आगरी-कोळी बांधवांचा कॅण्डल मार्च..

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विलिनीकरणासाठी पवारांवर आमदार-खासदारांचा दबाव?

Asia Cup Final : पाकिस्तान चारमुंड्या चित, भारतानं आशिया चषकावर कोरलं नाव, शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय

SCROLL FOR NEXT