ऑफलाइन शिक्षण 
महाराष्ट्र

#Dhule : येथे १ ऑगस्‍टपासूनच सुरू झाले ऑफलाइन शिक्षण

भूषण अहिरे

धुळे : कोरोनाच्‍या प्रादुर्भावात सर्व बंद झाले. शाळा, महाविद्यालय बंद झाले. यामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण प्रणाली सुरु झाली. असे असताना धुळ्यात मात्र एक ऑगस्टपासून ऑफलाइन पद्धतीनेच शिक्षण सुरू केले. याचा फायदा विद्याथ्‍र्यांना झाला. (dhule-news-coronavirus-spred-but-ofline-education-start-in-first-augast)

राज्यात गेल्या दीड वर्षापासून सर्व शाळा-कॉलेजेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असताना देखील धुळ्यात मात्र कोरोनाचे सर्व नियम पाळत आदर्श शिक्षण प्रसारक मंडळतर्फे निवासी शिक्षण व्यवस्था गेल्या १ ऑगस्टपासून सुरू आहे. येथील विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात देखील शिक्षणापासून वंचित न ठेवण्याचा निर्धार शाळा प्रशासनाने घेतला होता. त्याप्रमाणे येथील सर्व विद्यार्थ्यांना कोरोनाचे नियम पाळत निवासी शिक्षण व्यवस्था सुरू करण्यात आली. सर्व नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांना ज्ञानाची गंगा देण्याचे काम सुरू ठेवण्यात आले.

नेटवर्कची समस्‍या असल्‍याने..

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे कोरोनाच्या संकट काळामध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार ऑफलाइन पद्धतीने शिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली. परंतु ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांना मोबाईल त्याचबरोबर नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेणे शक्य होत नव्हते. म्हणूनच एक ऑगस्टपासून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ऑफलाइन पद्धतीने कोरनाचे सर्व नियम पाळत शिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली.

कोरोनाची लागन नाही

१ ऑगस्टपासून ऑफलाईन पद्धतीने शिक्षण प्रणाली सुरू करण्यात आल्यानंतर अद्यापही कुठल्याही विद्यार्थ्याला त्याचबरोबर शिक्षकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नसून विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने महत्त्वपूर्ण शिक्षण देण्याचे काम शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे. त्यासंदर्भात आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे देण्यात आलेल्या सुविधा संदर्भात विद्यार्थ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT