Narayan Rane Latest Marathi News, Dhule Latest Marathi News
Narayan Rane Latest Marathi News, Dhule Latest Marathi News Saam tv
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दिलासा; धुळे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

भूषण अहिरे

धुळे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर धुळ्यामध्ये गेल्यावर्षी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता; त्या संदर्भात सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला असल्यामुळे मंत्री राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (dhule news Consolation to Minister Narayan Rane Dhule Sessions Court grants pre arrest bail)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेल्यावर्षी महाड येथील पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल धुळे (Dhule) शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात मंत्री नारायण राणे यांच्या अटकपूर्व जामीन संदर्भात अर्ज देखील दाखल करण्यात आला होता. त्यावर धुळे जिल्हा सत्र न्यायालयमध्ये सुनावणी पार पडली आहे. मंत्री नारायण राणे यांच्या बाजूने त्यांचे वकील अनिकेत निकम यांनी बाजू मांडली. (Narayan Rane Latest Marathi News)

कुठलीही चौकशी नाही

ॲड. निकम यांनी बाजू मांडत असताना प्रामुख्याने मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण झाला नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. त्याचबरोबर गेल्या वर्षभरापासून या दाखल असलेल्या गुन्ह्यात संदर्भात मंत्री नारायण राणे यांची कुठलीही चौकशी करण्यात आली नाही आणि त्यामुळेच मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मंत्री नारायण राणे यांचा जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण उद्धव ठाकरे शब्द बदलणार नाहीत; जयंत पाटील

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

Explainer : ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी, दुसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

Chandrahar Patil : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत पराभव कोणी केला?; चंद्रहार पाटील यांनी केला गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT