Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : स्वतःला जाळून घेणाऱ्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू; घटनेपूर्वी काय घडले सीसीटीव्हीमध्ये कैद

Dhule News : धुळे तालुक्यातील नगाव येथे घडलेल्या या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी बराच वेळ फोनवर बोलत असल्याची माहिती समोर आली आहे

भूषण अहिरे

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव बसस्थानकाच्या मागे एका तरुणीने ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून स्वतःला जाळून घेतल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास समोर आली होती. नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान या तरुणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

धुळे (Dhule) तालुक्यातील नगाव येथे घडलेल्या या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी बराच वेळ फोनवर बोलत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय तरुणीने माचिस देखील नागरिकांकडे मागितल्याची माहिती समोर आली आहे, सदर तरुणी हि मध्यप्रदेश येथील इंदोरमधील असल्याचे तिच्या बॅगेत आढळून आलेल्या आधार कार्ड वरून उघडकीस आले आहे. तरुणीने स्वतःच अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून जाळून घेतले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नगाव स्टॉप जवळील निर्जनस्थळी तरुणी जळत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांनी उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते, या सर्व प्रकाराचा पोलिसांतर्फे (Police) तपास सुरू आहे.

घटनेपूर्वी तरुणी सीसीटीव्हीत कैद 

नगाव येथे अर्धवट जळालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. तरुणीचा घटने पूर्वीचा सीसीटीव्ही फुटेज साम टीव्ही च्या हाती लागला असून, या सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळाजवळ तरुणी जवळपास एक ते दीड तास हॉटेलबाहेर थांबून असल्याचे दिसून येत आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT