Dhule Accident Saam Tv News
महाराष्ट्र

Dhule News: दुर्दैवी! बहिणीच्या अंत्यविधीला जाताना दोघा भावंडांचा अपघाती मृत्यू: मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

Dhule Accident News: दुचाकीला धडक बसल्यानं बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोघा भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी चालक फरार झाला असून, पोलिसांकडून तपास सुरूय.

Bhagyashree Kamble

भूषण अहिरे, साम टीव्ही | धुळे

बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोन भावंडांचा अपघाती मृत्यू झाला. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात हा अपघात झाला. दोघे दुचाकीवरून निघाले होते. घाटातच चारचाकी वाहनाची जोरदार धडक लागली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी चालक फरार झाला असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, या दुर्देवी घटनेनंतर धुळ्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सेंधवाजवळील बारदवारी गावात राहणाऱ्या बहिणीचं निधन झालं. बहिणीच्या अंत्यविधीसाठी दोन्ही भाऊ आपल्या कुटुंबासोबत जात होते. मात्र, बहिणीच्या अंत्यविधीला पोहोचण्यापूर्वीच त्यांना मृत्यूनं गाठलं. दोघं ज्या दुचाकीवरून जात होते, त्याच दुचाकीला चारचाकीनं धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दगडू भावका बंजारा (वय ५५) आणि रामचंद्र सदू बंजारा (४५) असे मयत दोघा भावांची नावं आहेत. शिरपूर तालुक्यातील लौकी येथील रहिवासी असलेल्या बंजारा भावंडांच्या बहिणीचा सेंधवाजवळील बारदवारी गावात मृत्यू झाला होता. तिच्या अंत्यविधीला दुचाकीवरून जात असतानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

चारचाकीनं दुचाकीला जबर धडक दिली. या जबर धडकेत दोघांचाही दुर्देवी अंत झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीनं धडक दिल्यानंतर चालकानं तेथून पळ काढला. दरम्यान, फरार वाहनचालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

अपघात कसा घडला?

बहिणीच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीला दोघे भाऊ दुचाकीवरून निघाले होते. ते मुंबई-आग्रा महामार्गावरून जात होते. दुचाकी बिजासन घाटात आली. त्याचवेळी चारचाकी वाहनानं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ती धडक इतकी जोरदार होती की, यात ते दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ragda Pattice Recipe : संडे स्पेशल चटपटीत स्नॅक्स, स्ट्रीट स्टाइल रगडा पॅटीस 'असे' बनवा घरी

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या मनपुर वर्तुळात वनपालाचा होरपळून मृत्यू

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

SCROLL FOR NEXT