पांझरा नदी 
महाराष्ट्र

पांझरा नदीच्‍या पुरात पोहण्यासाठी उडी; तरूण प्रवाहात गेला वाहून

पांझरा नदीच्‍या पुरात पोहण्यासाठी उडी; तरूण प्रवाहात गेला वाहून

भूषण अहिरे

धुळे : पांझरा नदीला आलेल्या पुर आल्‍याने पुराच्या पाण्यात पोहण्याचा मोह तरूणांना आवरला गेला नाही. यात आज सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या तिघा तरुणांपैकी एक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. वाहून गेलेल्‍या तरूणाचे शोधकार्य सुरू आहे. (dhule-news-boys-swiming-floodwaters-of-the-Panjra-River-Carrying-the-young-went-into-the-stream)

अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पांझरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. शहरातून वाहणाऱ्या या नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघा तरुणांपैकी दोन तरुण बचावले. त्यांपैकी एक तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. परिसरातील नागरिकांनी या तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे अद्यापही हा तरुण सापडला नाही. राजेश पवार (वय ३०) असे या वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोहण्याची हौस महागात

प्रशासनातर्फे पांझरा नदीमध्ये पोहण्यासाठी जाऊ नये; असे आवाहन करण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या आव्हानाला केराची टोपली दाखवत हौशी तरुणांनी पोहण्यासाठी पांझरा नदीमध्ये उड्या टाकल्या. परंतु या तिघांपैकी दोघ तरुण सुखरूप बाहेर आले असून राजेश पवार हा तरुण प्रवाहात वाहून गेला. त्‍याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडू शकला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून अद्यापही तरुणाचा कुठल्याही प्रकारचा थांगपत्ता लागला नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT