Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : मुंबई- आग्रा महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको; मराठा आंदोलकांचे शिरपूर येथे आंदोलन

Dhule News : मुंबई- आग्रा महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको; मराठा आंदोलकांचे शिरपूर येथे आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : मराठा आंदोलनाची धग आता धुळ्यात देखील वाढतांना दिसून येत आहे. धुळ्याच्या शिरपूरमध्ये (Shirpur) देखील मराठा आंदोलन चांगले संतप्त झाले असून मराठा आंदोलकांनी (Maratha Aarkshan) मुंबई- आग्रा महामार्गावर रस्त्यात टायर जाळून रास्ता रोको केला आहे. (Breaking Marathi News)

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू आलेल्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी आंदोलन सुरु असून जाळपोड करत रास्ता रोको आंदोलन केले जात आहे. त्यानुसार शिरपूर येथील मराठा आंदोलकांनी देखील रास्ता रोको करत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारच्या विरोधात घोषणाबाजी 

रास्ता रोको (Dhule) आंदोलन करत संतप्त मराठा आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी देखील केली आहे. रास्ता रोको केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र संतप्त आंदोलकांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत रास्ता रोको दरम्यान खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmers : ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज मिळणार नुकसान भरपाई | VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sai Tamhankar Photos : ये रेशमी जुल्फें, ये शर्बती आँखें, इन्हें देखकर जी रहे हैं सभी

वर्गातच शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य, चौथीतील मुलीसोबत नेमकं काय घडलं? पुणे हादरलं

Accident News : स्कूल बसच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात

SCROLL FOR NEXT