Shirpur BJP Saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Result: 32 ग्रामपंचायतींवर भाजप; शिरपूर तालुक्‍यात आमदार पटेलांचेच वर्चस्‍व

33 ग्रामपंचायतींपैकी 32 ग्रामपंचायतींवर भाजप; आमदार पटेलांचेच वर्चस्‍व

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीचे मतमोजणीचे निकाल हाती आले आहेत. या 33 ग्रामपंचायतीपैकी 32 ग्रामपंचायतींवर भाजपचे (BJP) वर्चस्व असल्याचे बघावयास मिळाले आहे. तर एका ग्रामपंचायतीवर राष्‍ट्रवादी काँग्रेसला (Congress) विजय मिळाला आहे. (Dhule News Shirpur Taluka BJP)

शिरपूर (Shirpur) तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज सकाळी दहा वाजेपासून या 33 ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच ग्रामपंचायतीच्या निकालावर भाजपचे वर्चस्व असल्याचे बघावयास मिळाले आहे. तालुक्‍यातील 32 ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व कायम ठेवल्याचे बघायला मिळाले आहे.

पटेलांचे वर्चस्‍व कायम

शिरपूर तालुक्यातील संपूर्ण राजकारण हे माजी मंत्री तथा (Amrish Patel) आमदार अमरीशभाई पटेल यांच्या भोवतीच नेहमीच फिरताना बघायला मिळाले आहे. यापूर्वी अमरीश पटेल हे काँग्रेसमध्ये असताना शिरपूर तालुक्यात पूर्णतः काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते. परंतु त्यानंतर अमरीश पटेल यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या काही निवडणुकांपासून शिरपूर तालुक्यात भाजपचे वर्चस्व बघायला मिळाले आहे. 33 ग्रामपंचायतच्या निकालावर देखील भाजपचेच वर्चस्व असल्याचे बघायला मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

SCROLL FOR NEXT