Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: पाच लाखांची लाच घेताना लेखापरिक्षक ताब्यात

Dhule News पाच लाखांची लाच घेताना लेखापरिक्षक ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

धुळे : सावदा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील नगरपरिषदेच्या व्यापारी गाळ्याला नाव लावून अनामत रक्कम (Dhule) वर्ग करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना सहकारी संस्थेच्या विशेष लेखा परीक्षकाला येथील (Bribe) बसस्थानकात पकडण्यात आले. त्याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यास पोलिसांनी अटक केली. (Breaking Marathi News)

जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील श्री महालक्ष्मी सहकारी नागरी पतसंस्था अवसायानात निघाली. या संस्थेची व्यापारी गाळ्याची भरलेली सुरक्षा अनामत रक्कम संस्थेचे तत्कालीन प्रशासक अशोक बागल यांनी तीन लाख ८५ हजार रुपये रोखीने भरुन व्यापारी गाळा तक्रारदाराला दिला होता. काही दिवसांनी प्रशासक बागल यांची बदली झाली. त्यांच्या जागी धुळ्यातील सहकारी संस्थेचे (प्रक्रिया) विशेष लेखा परीक्षक सखाराम ठाकरे यांची नेमणूक झाली. जळगावच्या तक्रारदाराने नगरपरिषदेच्या दप्तरी नाव लावून संस्थेच्या गाळ्याची सुरक्षा अनामत रक्कम वर्ग करुन देण्याची ठाकरे यांच्याकडे मागणी केली. त्यासाठी ठाकरे याने तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. 

या प्रकरणी तक्रारदाराने धुळ्यातील (ACB) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी पथकामार्फत पडताळणी केली. नंतर गुरुवारी (ता. १७) रात्री उपअधीक्षक पाटील, पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास बारेला, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने धुळे मध्यवर्ती बसस्थानकात लाचखोर सखाराम ठाकरे याला पाच लाखांची लाच घेताना पकडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोणावळ्यात अखेर पावसाची दमदार हजेरी

Rain Alert : पावसानं जोर पकडला, पुढचे २४ तास महत्वाचे; मुंबई- पुण्यासह ३० जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Thailand Job Scam: थायलंडमध्ये नोकरीचं आमिष, ८०० भारतीय ओलीस; 'गोल्डन ट्रँगल'च्या जाळ्यात तरुण कसे अडकले?

वजन कमी होत नाही, चेहरा पण डल दिसतोय? सकाळी प्या 'हे' हेल्दी ड्रिंक

Health Care : पावसाळ्यात १०० आजारांवर एक उपाय 'आयुर्वेदिक चहा', वाचा फायदे

SCROLL FOR NEXT