Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Anil Gote : माजी आमदार अनिल गोटेंनी बांधले शिवबंधन; धुळ्यातून उमेदवारी निश्चित

Dhule News : पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी गोटे यांच्या हातात शिवबंधन बांधून हाती भगवा

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यातील माजी आमदार अनिल गोटे यांनी अखेर आज ठाकरे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. प्रवेश झाल्यानंतर धुळे शहर विधानसभेसाठी ठाकरे गट शिवसेनेतर्फे गोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

धुळ्यातील (Dhule) माजी आमदार अनिल गोटे यांना शिवसेना ठाकरे गटातर्फे उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आतापर्यंत सुरु होती. या दरम्यान गोटे यांनी आज मातोश्रीवर पक्षप्रवेश केला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी गोटे (Anil Gote) यांच्या हातात शिवबंधन बांधून हाती भगवा देत धुळे शहर विधानसभेसाठी उमेदवारी देखील जाहीर केली. तसेच ठाकरे गट शिवसेनेतर्फे अनिल गोटे यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे. 

नाराज पदाधिकाऱ्यांची भूमिका ठरणार महत्वाची

अनिल गोटे यांना शिवसेना ठाकरे गटातर्फे उमेदवारी जाहीर होत असल्याने महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू होती. मात्र आज प्रत्यक्षात प्रवेश झाल्यानंतर उमेदवारी देखील निश्चित झाली आहे. यामुळे आता महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही पक्षातील नाराज कार्यकर्ते व पदाधिकारी आता काय भूमिका घेतात यावर पुढचे समीकरण अवलंबून राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT