Anil Gote Saam tv
महाराष्ट्र

Anil Gote Press: धुळ्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी आमदार अनिल गोटे यांचा पक्षाला राम राम

Dhule News धुळ्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का; गोटे यांचा पक्षाला राम राम

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपप्रदेश अध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी राष्ट्रवादीला पुनश्च हरिओम म्हणत राम राम ढोकला आहे. (NCP) पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपविला असून सध्यातरी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे गोटे यांनी स्पष्ट केले आहे. (Breaking Marathi News)

माजी आमदार अनिल गोटे यांनी आज धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अनिल गोटे यांची गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीमुळे त्यांची घुसमट होत होती. यापूर्वी देखील (Dhule) गोटे यांनी वेळोवेळी पक्षश्रेष्ठींच्या जाहीर कार्यक्रमात देखील पक्षांतर्गत होत असलेल्या गटबाजीबाबत उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. 

गटबाजीमुळे सोडला पक्ष 

पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत असल्याचे म्हणत गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा (Dhule NCP) सुपूर्द केला आहे. याबाबत पक्षप्रमुख शरद पवार यांना देखील याबाबतची कल्पना दिली असल्याचे गोटे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT