Anganwadi Worker Saam tv
महाराष्ट्र

Anganwadi Worker : अंगणवाडी सेविकांचा थाळ्या वाजवत आंदोलन; मागण्या संदर्भात मोर्चा काढत केले आंदोलन

Dhule News : महाराष्ट्र राज्य कृती समितीच्यावतीने आज अंगणवाडी सेविकांचा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी

भूषण अहिरे

धुळे : प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मागील काही दिवसांपासून संपावर आहेत. शासनाकडून अद्याप (Dhule) मागण्यांसंदर्भात काही तोडगा काढण्यात आलेला नाही. यामुळे प्रशासनाला जग आणण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढत थाडी नाद आंदोलन केले. (Tajya Batmya)

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्यावतीने आज अंगणवाडी सेविकांचा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका (Anganwadi Workers) सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले आहे. वेतन वाढ त्याचबरोबर शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे मोबाईल देणे व पेन्शन त्याचबरोबर ग्रॅज्युएटी देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा भव्य मोर्चा अंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बसून थाळ्या वाजून झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर प्रशासनाने या मागण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढविण्याचा देखील इशारा प्रशासनाला यावेळी आंदोलकांतर्फे देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola: उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; २ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं

Saturday Horoscope: खास व्यक्तीसोबत संवाद होईल, पैशांची अडचण दूर होईल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Sunday Megablock : रविवारी प्रवाशांचे होणार मेगा हाल, 'या' मार्गावर असणार मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक

Pune : 'जुन्या खोडांना' बाजूला सारून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? शिवसेना पुणे शहरासाठी कोणाला नेमणार?

Maharashtra Live News Update : लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा समाजाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT