Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: गुदद्वारातून प्रेशरनळीने सोडली हवा; पोटातील आतड्या तुटून तरुणाचा मृत्यू

गुदद्वारातून प्रेशरनळीने सोडली हवा; पोटातील आतड्या तुटून तरुणाचा मृत्यू

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे येथील सुजलॉन कंपनीत काम करणाऱ्या (Dhule News) तरुणाच्या गुदद्वारात त्याच्याच सोबतच्‍या कर्मचार्यांनी प्रेशर नळी लावुन हवेचा प्रेशर वाढविला. हवेच्या प्रेशरने तरुणाच्या पोटातील आतड्या तुटल्याने तरुणाचा दुर्दैवी (Death) मृत्यू झाला आहे. (Breaking Marathi News)

तुषार निकुंभ असे मृत तरुणाचे नाव आहे. या तरुणाला या सर्व प्रकारानंतर त्रास होऊ लागला आणि त्यानंतर त्याला तात्काळ नंदुरबार (Nandurbar) येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्याची प्रकृती आणखीनच बिघडल्यामुळे तेथून नातेवाईकांनी सुरत (Surat) येथे उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान सुरत येथील रुग्णालयात या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नातेवाईकांचा गोंधळ

दुर्दैवी घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून नातेवाईकांनी तरुणाच्या मारेकऱ्यांना तात्‍काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी पोलिसांना घेराव घालत एकच गोंधळ केला आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, संबंधित कंपनीतील कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने हा प्रकार केल्याने यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT