Dhule Congress News
Dhule Congress News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: मोदी सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन; कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध

भूषण अहिरे

धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या उद्योजक धार्जिणी धोरणाविरोधात धुळ्यात (Dhule) काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले. मोदी सरकारच्‍या या धोरणा विरोधात धुळ्यात कॉंग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. (Maharashtra News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अदानी यांच्यावरती दाखवलेल्या मेहरबानीचा फटका सर्वसामान्य ठेवीदारांना बसत आहे. असा आरोप करत मोदी सरकारच्या उद्योजक धारजीनी धोरणा विरोधामध्ये धुळ्यात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. धुळ्यातील एसबीआय बँकेसमोर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोदी सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी करीत तीव्र निषेध आंदोलन केले आहे.

मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी

यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आमदार कुणाल पाटील यांनी या घोटाळ्यासंदर्भात संसदीय समिती नेमून पारदर्शक चौकशी करण्यात यावी. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी; अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. निषेध आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती अदानी यांचे हस्तांदोलन करतानाचे फोटो झळकावत मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, कांदा उत्पादकांची वाढली चिंता

Pune Rain: पुण्यात भयंकर पाऊस, व्हिडिओतून बघा पावसाचं रौद्ररूप

Eknath Shinde News | मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी वाहतूक थांबवली!

Arvind Kejriwal Released : मद्यधोरण घोटाळ्यात अटक, ५१ दिवस तुरुंगात; अरविंद केजरीवालांची तिहारमधून सुटका

Sharad Pawar Pune | पुण्यातील शरद पवारांची सभा रद्द

SCROLL FOR NEXT