Accident 
महाराष्ट्र

खड्यांमुळे भरधाव ट्रक पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

खड्यांमुळे भरधाव ट्रक पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

भूषण अहिरे

धुळे : रस्‍त्‍यांची झालेली खराब अवस्‍थेमुळे अपघाताचे सत्र कायम आहे. रस्‍त्‍यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकी चालकांना गाडी चालविता येत नाही. मात्र महामार्गावरील खड्ड्यांमुळे भरधाव वेगाने जाणार ट्रक पलटी झाल्‍याची घटना सुरत– नागपूर महामार्गावर घडली. (dhule-news-accident-news-surat-nagpur-highway-truck-accident)

धुळे तालुक्यातील नेर गावाजवळ सुरत– नागपूर महामार्गावर ट्रक (क्र. जीजे. ३६. व्‍ही. ०३३३) हा ट्रक पलटी झल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. परंतु या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त ट्रकमध्ये प्लास्टिक पेपर व कोरा पेपर भरलेले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तात्काळ पुढील बचावकार्य करण्यात आले.

समोरून वाहन अन् खड्डे चुकविताना पलटी

ट्रक गुजरात राज्यातून धुळ्याकडे जात असताना हा अपघात घडला आहे. तसेच समोरच्या वाहन चालकाने हुलकावणी देत खड्डे टाळण्याचा प्रयत्न करत असतांना वाहनवरील ताबा सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला आहे. रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य बघावयास मिळत असून या घाड्यांमुळे वाहनांचे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT