Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: तीन कार, ट्रकचा विचित्र अपघात; कारमधील चार जण जखमी

तीन कार, ट्रकचा विचित्र अपघात; कारमधील चार जण जखमी

भूषण अहिरे

धुळे : मुंबई– आग्रा महामार्गावर स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भरधाव चालणाऱ्या वाहन धारकाने अचानक ब्रेक (Accident News) दाबला. यामुळे मागून येणाऱ्या दोन कार व त्यांच्या पाठीमागे असलेल्या ट्रकचा विचित्र अपघात झाला आहे. (Letest Marathi News)

धुळे (Dhule) तालुक्यातील आर्वी येथे मुंबई– आग्रा महामार्गावर स्पीड ब्रेकरजवळ पुढील कार अचानक थांबली. यामुळे पाठीमागून भरदाव वेगाने येणाऱ्या दोनही कार एकमेकांवर जाऊन आदळल्या. तर त्यांच्या पाठीमागे भरधाव वेगाने येणारा ट्रकने देखील या तीनही कारला पाठीमागून जबर धडक दिली.

कारमधील प्रवाशी जखमी

तीन कार व ट्रकमध्ये झालेल्या अपघातामध्ये चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वाहनातील तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आर्वी पोलीस ठाणे समोरच हा विचित्र अपघात झाल्यामुळे तात्काळ पोलिसांनी धाव घेत बचावकार्य करीत महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक तात्काळ सुरळीत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

Ladki Bahin Yojana : लाडकीचे किती अर्ज आले? किती अपात्र? दर महिन्याला किती पैसे लागतात?

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Mehndi Design: श्रावणात हातावर उठून दिसतील सोप्या अन् आकर्षक मेंहदी डिझाईन्स

Shocking : अंत्ययात्रेत अंधाधुंद गोळीबार; ७ जणांचा जागीच मृत्यू , घटनास्थळी लोकांची धावाधाव

SCROLL FOR NEXT