Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime: दुचाकी अडवून सात लाख लुटले; धुळ्याजवळ मुंबई आग्रा महामार्गावरील घटना

Dhule News : सायंकाळी अंधार पडल्यानंतर रहदारीच्या रस्त्यात लूटमार झाली. महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकी वाहनधारकांच्या मागून दुचाकीने दोघे आले

भूषण अहिरे

धुळे : गेल्या काही दिवसांमध्ये रस्ता लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच दरम्यान सोमवारी (२७ नोव्हेंबर) संध्याकाळी (Dhule) धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर रास्ता लुटीची घटना घडली आहे. यात दुचाकी (Crime News) अडवून तब्बल ७ लाख रुपये लुटून फरार झाले. (Live Marathi News)

धुळे शहरापासून जवळ असलेल्या आर्वी परिसरात मुंबई- आग्रा महामार्गावर हा प्रकार घडला आहे. २७ नोव्हेंबरला सायंकाळी अंधार पडल्यानंतर रहदारीच्या रस्त्यात लूटमार झाली. महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकी वाहनधारकांच्या मागून दुचाकीने दोघे आले. त्या दोघा चोरट्यांनी दुचाकी आडवी लावून गाडी अडविली. यानंतर चोरट्यांनी रस्त्यात आडवुन बेदम मारहाण करीत त्याकडील असलेल्या बॅगेतील सात लाख रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांकडून शोध सुरु 
मुंबई- आग्रा महामार्गावर घडलेल्या या घटनेनंतर धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्या संदर्भात धुळे तालुका पोलिसांतर्फे लूट करणाऱ्या चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे. लवकरात लवकर या चोरट्यांच्या मुसक्या आवरल्या जातील; असा विश्वास पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT