St Bus
St Bus Saam tv
महाराष्ट्र

५५६ कर्मचारी ‘ऑन ड्युटी‘; बससेवा पूर्वपदावर

साम टिव्ही ब्युरो

धुळे : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी कामावर परतल्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून रस्त्यांवर न दिसणारी लालपरी अर्थात एसटी बस आता धावताना दिसत आहे. विविध मार्गांवर बससेवा सुरू झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. धुळे आगारात बडतर्फ कर्मचारी वगळता इतर सर्व ५५६ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे धुळे (Dhule) आगारातून विविध मार्गांवरील सेवाही पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे धुळे आगारातील जवळपास सर्व बस ‘सुस्थितीत' असल्याने त्यांच्या दुरुस्तीवर होणारा खर्चही टळला आहे. (dhule news 556 employees on duty Bus service pre position)

राज्य शासनात विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) कर्मचारी गेले पाच महिने संपावर होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व इतर काही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संपकरी कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली. धुळे आगारात कर्मचारी कामावर परतण्याची वेग तुलनेने संथ होता. मात्र मुदतीअखेर सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. आंदोलनादरम्यान बडतर्फ झालेले ३८ कर्मचारी फक्त आता कामावर नाहीत. त्यामुळे धुळे आगारातून (St Bus) बससेवेची स्थिती आता पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे.

विविध मार्गांवर बस सुरू

संपकाळात रस्त्यावर अजिबातच न दिसणारी एसटी काही कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर कुठेतरी नजरेस पडत होती. आता मात्र पूर्वीप्रमाणे विविध मार्गांवर एसटी धावताना दिसत आहे. धुळे आगारातून (Pune) पुणे, भुसावळ, सोलापूर, सुरत, पंढरपूर, शेगाव, कळवण, चोपडा आदी विविध मार्गांवर बससेवा सुरू झाली आहे. अहमदाबाद बससेवेच्या परमीटचा प्रश्‍न अद्याप प्रलंबित असल्याने ही सेवा अद्याप सुरू झालेली नाही. शिवाय ग्रामीण भागातही एसटी पोहोचू लागली आहे. काही मुक्कामी जाणाऱ्या बस पूर्वीप्रमाणेच सुरू झाल्याचे आगारप्रमुख अनुजा दुसाने यांनी सांगितले.

उत्पन्नातही वाढ

संपामुळे एसटीची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळली होती. ती आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. धुळे आगारातून धावणाऱ्या बस दररोज ४० हजार किलोमीटरचा पल्ला गाठत आहेत. यातून रोज सुमारे ११ ते १२ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.

बस सुस्थितीमुळे दिलासा

संप काळात गेल्या पाच महिन्यांपासून आगारात उभ्या असलेल्या बस नादुरुस्त होण्याचे प्रमाणही मोठे असल्याचे सांगितले जाते. राज्यभरात अशा नादुरुस्त बस दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार असल्याचा अंदाज व्यक्त होतो. याबाबतीत धुळे आगारात मात्र दिलासादायक चित्र आहे. आगारात एकूण १३० बस आहेत, त्या सर्व सुस्थितीत असल्याचे आगारप्रमुख श्रीमती दुसाने यांनी सांगितले. संप काळात काही मार्गांवर बस धावत होत्या, त्यावेळी आलटून-पालटून सर्व बस उपयोगात आणल्या गेल्या. त्या एकाच जागेवर पडून राहिल्या नाहीत. त्यामुळे या बस नादुरुस्त झाल्या नाहीत, सुस्थितीत आहेत असेही त्या म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT