Jal Jeevan Mission Saam tv
महाराष्ट्र

Jal Jeevan Mission : 'हर घर जल' योजनेपासून ५०५ गावे अजून दूरच; धुळे जिल्ह्यात ९८ टक्के जोडणी

dhule News : कुटुंबाला घरगुती स्तरावर नळाद्वारे नियमित शुद्ध व ५५ लिटर प्रति माणसी पाणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने 'जल जीवन मिशन'ची सुरुवात

Rajesh Sonwane

धुळे : जल जीवन मिशन अभियानांतर्गत ३१ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील ९८.८३ टक्के वैयक्तिक आणि संस्थात्मक (Dhule) नळ जोडण्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील १६५ गावामध्ये 'हर घर जल' योजना पोहोचली असून अद्याप ५०५ गावे वंचितच राहिली आहेत. (Maharashtra News)

धुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला घरगुती स्तरावर नळाद्वारे नियमित शुद्ध व ५५ लिटर प्रति माणसी पाणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने 'जल जीवन मिशन'ची सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील १०० टक्के कुटुंबांना नळजोडणी देऊन शाश्वत पाणीपुरवठा करण्यासह गावातील सर्व शाळा, अंगणवाड़ी, संस्था, सार्वजनिक ठिकाणे यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करावयाचा आहे. त्यानुसार (Zilha Parishad) जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतरगत जिल्ह्यातील गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आलेली आहेत.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याची घोषणा अनेक वर्षे केली जात आहे. आता हर घर जल यासारख्या योजनांमुळे ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार नसून लाखो कुटुंबांच्या घरापर्यत नळपाणी पुरवठा योजना पोहोचली असल्याने आता तरी बहुसंख्य महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरेल, अशी अपेक्षा असून या योजनेच्या कामाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गती देण्यात यावी अशी मागणी जोर धरून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

IND VS AUS: तुला कॉल द्यावा लागेल..; भरसामन्यात रोहित-अय्यरमध्ये जुंपली, दोघांमध्ये नेमका काय झाला मॅटर|Video Viral

Flesh-Eating Screwworm: अमेरिकेत मांस खाणाऱी माशी? नरभक्षक माशी संपवणार माणूस?

Horoscope: गोड बातमी मिळेल,लॉटरी लागणार; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल आनंदाचा

Maharashtra Live News Update: भांडुप कोकण नगरमधील अरुणोदय टॉवरमध्ये 15 व्या मजल्यावर आग

SCROLL FOR NEXT