Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

Dhule Corporation : प्लॅस्टिक व्यापाऱ्यांना ३५ हजार दंड; धुळे महापालिका पथकाची कारवाई

Dhule News : धुळे महापालिकेच्या पथकाकडून अधूनमधून प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाया होतात. मात्र, यातून प्लॅस्टिक विक्री, वापराला लगाम लागत नसल्याचे चित्र पाहायला मिळते.

साम टिव्ही ब्युरो

धुळे : शासनाने बंदी केली असताना देखील प्लॅस्टिक वापर केला जात आहे. याच दरम्यान प्लॅस्टिक गोडाऊनमध्ये आढळल्याने (Dhule) धुळे महापालिकेच्या पथकाने दोन व्यापाऱ्यांकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईत दोन टन प्लॅस्टिक देखील जप्त केले आहे. (Live marathi News)

धुळे महापालिकेच्या (Dhule Corporation) पथकाकडून अधूनमधून प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाया होतात. मात्र, यातून प्लॅस्टिक विक्री, वापराला लगाम लागत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. विक्री, वापरही होत असल्याचे दिसते. (Plastic Ban) बाजारात आज कोणत्याही छोट्या-मोठ्या विक्रेत्याकडून ग्राहकांना प्लॅस्टिक कॅरिबॅग सहज उपलब्ध केली जाते. त्यामुळे अशा कारवाईतून काही साध्य होत नसल्याचेच दिसते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दंडाची रक्कमही केली वसूल  

धुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे- पाटील, यांच्या आदेशाने महापालिकेचे पथक २१ फेब्रुवारीला शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील एका प्लॅस्टिक गोडाऊनमध्ये गेले. या गोडाऊनमध्ये दोन टन प्लॅस्टिक आढळून आले. या प्रकरणी पथकाने सतीश राधेश्याम सिंधी यांना २५ हजार रुपये, तर प्रकाशभाई सिंधी यांना दहा हजार रुपये असा एकूण ३५ हजार रुपये दंड केला. दंडाची ही रक्कम पथकाने संबंधित व्यापाऱ्यांकडून वसूल केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT