Dhule Nandurbar Bridge  Saam Tv
महाराष्ट्र

Dhule News: धुळे-नंदुरबारला जोडणाऱ्या सारंगखेडा पुलावर मोठे भगदाड, वाहतूक ठप्प

Dhule Nandurbar Bridge: धुळे-नंदुरबारला जोडणाऱ्या सारंगखेडा पुलावर मोठे भगदाड, वाहतूक ठप्प

Satish Kengar

>> सागर निकवाडे

Dhule Nandurbar Bridge:

नंदुरबार-धुळे जिल्ह्याला जोडणारा सारंगखेडा पुलाला संततधार पावसाने मोठे भगदाड पडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सारंगखेडा येथील तापी नदीवर ब्रिटिश कालीन पूल बांधण्यात आला होता.

गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून तापी नदीला मोठा पूर आला. यादरम्यान तापी नदीवरील पुलावर मोठं भगदाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

घटनास्थळी प्रशासन व पोलीस दाखल झाले असून दोंडाईचा बाजूने पुलाच्या येणाऱ्या भागातील भरावा वाहून गेल्याने पुलाला भगदाड पडले आहे. घटनास्थळी शहादा तहसीलदार व पोलीस प्रशासनाने धाव घेतली असून पुलावरील वाहतूक बंद केली आहे. (Latest Marathi News)

दोंडाईचा पोलीसांनी नंदुरबार चौफुली तर शहादा पोलीसांनी अनरद बारी जवळून वाहतूक वळवली. पुलावरील रस्त्याला तडे देखील पडल्याचे चित्र दिसत आहे. गेल्याच वर्षी पुल बंद करुन राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुरुस्ती केली होती. असं असतांना भराव वाहून भगदाड पडल्याने कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्या तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने पुर परिस्थीती निर्माण झाली. तापी नदीच्या काठच्या गावाने नंदुरबार प्रशासनाने सतर्कतेच्या इशारा दिला आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने तापी नदी धोक्याच्या पातळी ओलांडल्याचे चिन्ह दिसून येत आहे. 111 मीटर तापी नदीची धोक्याची पातळी आहे, सध्या 110 मीटर पर्यंत तापी नदीची पातळी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Maharashtra Live News Update: विना परवाना गावठी कट्टा आणि पोलिस गणवेश बाळगणाऱ्यास अटक

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

SCROLL FOR NEXT