Dhule ST Bus Accident  Saam TV
महाराष्ट्र

Bus Accident : धुळ्यात एसटी बसला भीषण अपघात; २० हून अधिक प्रवासी जखमी

धुळे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळ्यात एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघात २० प्रवासी जखमी झाले आहेत.

भूषण अहिरे

Dhule ST Bus Accident : धुळे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळ्यात (Dhule) एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघात २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती आहे.  (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही चाळीसगाव येथून प्रवाशांना घेऊन अक्कलकुवाकडे निघाली होती. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बस धुळे तालुक्यातील तरवाडे गावाजवळ आली असता, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका वाहनाने बसला हुलकावणी दिली.

हुलकावणी देताच, बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. आणि बस थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या भीषण अपघातात (Bus Accident) जवळपास २० प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT