Dhule Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime: अडीच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, ८० वर्षांच्या वृद्धाचं संतापजनक कृत्य; धुळे हादरले

Dhule Crime News: धुळ्यामध्ये अडीच वर्षांच्या मुलीवर ८० वर्षांच्या वृद्धाने लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे धुळे हादरले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

Priya More

Summary:

  • धुळ्यामध्ये अडीच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

  • ८० वर्षांच्या वृद्धाचं भयंकर कृत्य

  • स्थानिकांच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

  • पोलिसांनी आरोपीला केली अटक

भूषण अहिरे, धुळे

धुळ्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. धुळ्यामध्ये अडीच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. धुळे शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात ही घटना घडली. ८० वर्षीय वृद्धाने हे भयंकर कृत्य केले. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील विश्वकर्मा नगरमध्ये सोमवारी ही घटना घडली. एका ८० वर्षीय वृद्धाने अडीच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने चिमुकलीची सुटका केली आणि संशयित वृद्धाला पकडले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती चाळीसगाव रोड पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वृद्धाला ताब्यात घेतले. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून, संशयित आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस तपासाला वेग आला आहे. लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाद की नाबाद? अंपायरनं दिलं आऊट, गुजरातचं फुल सेलिब्रेशन; तरी मैदान सोडेना कोहली; कॅचवरून उडाला गोंधळ

LPG Cylinder Price: सकाळ सकाळी महागाईचा झटका, 'हा' गॅस सिलिंडर महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

Heart Attack Recovery: हार्ट अटॅकनंतर कोणता व्यायाम सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...

Today Horoscope : आज 'या' ३ राशींना होणार फायदाच फायदा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे खास?

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

SCROLL FOR NEXT