Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : धुळे हादरले; भर चौकात तरुणाचा खून, हेडफोन गिफ्ट देण्यावरून वाद विकोपाला

Dhule News : धुळे शहरातील चित्तोड रोडवरील ध्वज चौकात गौरव आणि मोबाईल सिम कार्ड विक्रेता स्टॉलधारक यांच्यात वाद झाला. हेडफोन गिफ्ट देण्याच्या कारणावरून वाद उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे

भूषण अहिरे

धुळे : अगदी शुल्लक कारणावरून धुळे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. हेडफोन गिफ्ट देण्यावरून झालेला वाद विकोपाला गेला. यातून धुळे शहरातील चित्तोड रोडवरील ध्वज चौकात एका 27 वर्षीय तरुणावर हत्याराने वार करत खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. भर दिवस घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.  

धुळे शहरात भर दिवसा घडलेल्या या घटनेत गौरव किरण माने (वय २७) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. धुळे शहरातील चित्तोड रोडवरील ध्वज चौकात एका पान सेंटरसमोर गौरव किरण माने आणि मोबाईल सिम कार्ड विक्रेता स्टॉलधारक यांच्यात वाद झाला. हेडफोन गिफ्ट देण्याच्या कारणावरून हा वाद उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे. गौरव व स्टॉलधारक यांच्या निर्माण झालेल्या वाद विकोपाला गेला.  

रस्त्यावर गाठत हल्ला 

सदरच्या प्रकरणातील संशयित आरोपी जय राजेंद्र पाकळे व गौरव यांच्यात हा वाद होता. दरम्यान गौरव हा तालीमकडे जात असताना संशयित आरोपी जय पाकळे, ओम राजेंद्र पाकळे आणि राजेंद्र एकनाथ पाकळे यांनी त्याला अडवून संगनमताने हल्ला केला. जय पाकळेने चाकूसारख्या हत्याराने गौरवच्या पोटात वार केले. तर ओम पाकळेने लोखंडी हातोडीने मारहाण केली. या हल्ल्यात गौरवचा मृत्यू झाला आहे.  

तिघांविरोधात गुन्हा दाखल 

घटनेची माहिती धुळे पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत असून मारेकरींचा शोध घेत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक सुशील केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

SCROLL FOR NEXT