Bike Theft Saam tv
महाराष्ट्र

Bike Theft : दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात; दहा दुचाकी जप्त

Dhule News : दुचाकी चोरी संदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती धुळे तालुका पोलिसांनी या संदर्भात तपासाची चक्र फिरवली. यानंतर संबंधित दुचाकी चोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

भूषण अहिरे

धुळे : मागील काही दिवसात दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनांबाबत दाखल तक्रारींवरून पोलिसांनी तपास करत दुचाकी चोरी करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे असलेल्या चोरीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 

धुळे शहर व परिसरातून भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. मागील काही दिवसात घरफोड्यांच्या देखील घटना घडल्या आहेत. यातच मागील काही दिवसात धुळे शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकी चोरीची घटना उघडकीस आली होती. या संदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

दुचाकी चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर धुळे तालुका पोलिसांनी या संदर्भात तपासाची चक्र फिरवली. यानंतर संबंधित दुचाकी चोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याकडून त्याने चोरी केलेल्या जवळपास दहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. दुचाकी चोरी प्रकरणी एकजण ताब्यात सापडला असून त्याच्यासोबत कोण आहे; याचा तपास पोलीस करत आहेत. 

जळगाव, नाशिकमधूनही चोरी 
पोलिसांनी हस्तगत केलेल्या दहा दुचाकींमध्ये जळगाव, नासिक व नंदुरबार या जिल्ह्यातून देखील या चोरट्याने दुचाकी चोरल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे. या संदर्भात आता धुळे तालुका पोलीस पुढील सखोल चौकशी करीत आहेत. तसेच या दुचाकी चोरट्याने आणखी दुचाकी चोरल्या आहेत का याचा देखील पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

Hair Care : घरच्या घरी बनवा हे हेअर जेल, राठ केस होतील मऊ आणि चमकदार

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

Pivali Sadi Song: संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी; 'पिवळी साडी' गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ

SCROLL FOR NEXT