Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : धुळ्यात रात्रीचा थरार.. कुटुंबीयांवर रोखली बंदुक; साडेतीन लाखांहून अधिकचा ऐवज घेऊन चोरटे पसार

Dhule News : चोरट्यांनी मागच्या दरवाजाने घरात प्रवेश केला व घरात असलेल्या महिलेला बंदुकीचा धाक दाखवून घरातील सोने-चांदीचे दागिने व पैसे कुठे ठेवले असे विचारणा केली.

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील जामचा मळा येथील सुलतानया मदरसा परिसरात रात्रीच्या वेळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. घरात प्रवेश करत कुटुंबियांच्या डोक्याला बंदूक लावून घरातील सोन्या- चांदीचे दागिने लुटून पोबारा केल्याची घटना घडली आहे, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घाबरत पसरली आहे. 

धुळे (Dhule) शहरातील रात्रीच्या वेळी हि थरारक घटना घडली आहे. चोरट्यांनी मागच्या दरवाजाने घरात प्रवेश केला व घरात असलेल्या महिलेला बंदुकीचा धाक दाखवून घरातील सोने-चांदीचे दागिने व पैसे कुठे ठेवले असे विचारणा केली. यानंतर या चोरट्यांनी घरात असलेल्या कपाटात तपासणी केली असता जवळपास साडेतीन लाखांहून अधिकचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले. तसेच कोणालाही याबाबतची वाच्यता न करण्याची धमकी महिलेला दिली. त्यानंतर जाताना महिलेच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने देखील घेऊन (Theft) चोरट्यांनी पोबारा केला आहे,

चोरटे पसार झाल्यानंतर महिलेची आरडाओरड 
यासंदर्भात चोरट्यांनी सर्व दागिने घेऊन पलायन केल्यानंतर महिलेने आरडाओरड करत कुटुंबीतील इतर सदस्यांना उठवित घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी येत सर्व हकीकत जाणून घेतली. या संदर्भात पोलीसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस प्रशासनातर्फे पुढील तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे सेवा विस्कळीत

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT