Sakri Crime Saam tv
महाराष्ट्र

Sakri Crime : खाद्य तेलासह वाहन घेऊन चोरटे पसार; तीन तासात चोरटा ताब्यात

Dhule News : सोयाबीन खाद्यतेलाच्या आठ लोखंडी टाक्या ठेवलेल्या होत्या. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात अलर्ट देण्यात आला होता

भूषण अहिरे

धुळे : पिंपळनेर शहरात सोयाबीन तेलाची वाहतूक करणारे पिकअप वाहन पहाटेच्या सुमारास चोरीला गेले होते. यात तेलाच्या टाक्यात देखील होत्या. याबाबत पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविताना अवघ्या तीन तासात चोरट्याने गाडीसह ताब्यात घेतले आहे. यात सात लाखाहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे गाडी चोरीची घटना घडली होती. पिंपळनेर येथील हिरालाल रघुनाथ दशपुते यांच्या मालकीची पिकअप गाडी २२ फेब्रुवारीला पहाटे साडेपाच वाजता पिंपळनेर येथुन चोरीला गेली होती. या वाहनात सोयाबीन खाद्यतेलाच्या आठ लोखंडी टाक्या ठेवलेल्या होत्या. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात अलर्ट देण्यात आला होता.

धुळ्याकडे जाताना घेतले ताब्यात 

याबाबतची माहिती पोलीस प्रशासनातर्फे वायरलेसवरून जिल्हाभरात कळवण्यात आली होती. या नंतर चोरीच्या वाहनासह संशयीत धुळ्याकडे पसार झाल्याची माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाली. धुळे तालुका पोलीस अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यानंतर अवघ्या तीन तासात आरोपीला चोरीच्या वाहनासह ताब्यात घेत या चोरीचा छडा लावला आहे. आरीफ नूर मोहम्मद शेख असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. 

सात लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 

दरम्यान आरोपीने वाहनाचा बिलाडी- जापी रोडवर अपघात केल्याचे सांगून वाहन तसेच सोडल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी पाच लाखांचे वाहन, दोन लाख आठ हजार ८०० रुपये किंमतीच्या सोयाबीन खाद्यतेलाच्या आठ लोखंडी टाक्या. असा मिळून सात लाख आठ हजार 800 रुपयांचा माल जप्त करत तो पिंपळनेर पोलिसांना सोपवला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसणं महत्वाचं आहे - उद्धव ठाकरे

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT