Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून पसार झालेला चोरटा ताब्यात

Dhule News : चोरट्याने मागून येऊन अचानकपणे गळ्यातील चैन ओरबाडून पोबारा केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली होती

भूषण अहिरे

धुळे : रस्त्याने पायी चालत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून चोरटा पसार झाल्याची घटना घडली होती. याचा पोलिसांनी तपास करत चेन चोरट्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुद्देमालासकट मुसक्या आवळल्या आहेत.  

धुळे (Dhule) शहरातील देवपूर परिसरातील नकाने रोड वरून आपल्या घराकडे पायी जात असलेल्या महिलेची एका चोरट्याने मागून येऊन अचानकपणे गळ्यातील चेन ओरबाडून पोबारा केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली होती. या संदर्भात संबंधित महिलेने पोलिसांत जाऊन तक्रार दिली होती. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (Dhule LCB) संबंधित परिसरामध्ये या चोरट्याचा शोध घेतला असता, संबंधित चोरटा हा पोलिसांच्या हाती लागला आहे. 

२७ ग्रॅमची चैन केली हस्तगत  
पोलिसांनी (Police) या चोरट्याकडून चोरलेली सोन्याची चेन हस्तगत केली. ही सोन्याची चेन जवळपास २७ ग्रॅम वजनाची असून तिची बाजारामध्ये दोन लाखांहून अधिकची किंमत मानली जात आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे या संदर्भात पुढील कारवाई केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी शिवाजी खांडेकर रिंगणात

Earthquake : पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के; ५.२ तीव्रतेच्या हादऱ्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; इंडोनेशिया हादरलं

Famous Director Death: ज्येष्ठ प्रयोगशील दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला संपवलं, भरचौकात ४ गोळ्या झाडल्या; थरारक VIDEO समोर

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT