Son Killed Father  Saam Tv
महाराष्ट्र

Dhule Crime : 'घरात बसण्याऐवजी कामधंदा कर', टोमण्याने तरूण संतापला ; डोक्यात दगड घालून बापाला संपवलं

Son Killed Father In Sakri Taluka : वडिल सारखे कामधंदा कर म्हणून मागे लागले होते. त्यामुळे संतापलेल्या तरूणाने वडिलांची हत्या केलीय.

Rohini Gudaghe

विनोद जिरे, साम टीव्ही धुळे

धुळे जिल्ह्यात एका तरूणाने आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना समोर आलीय. 'घरात बसण्याऐवजी काही कामधंदा कर', असे वडिलांनी सांगितल्यानंतर मुलगा प्रचंड संतापला. वडिलांच्या या बोलण्याचा राग डोक्यात धरून त्याने वडिलांच्या डोक्यात दगड टाकून निर्घुणपणे हत्या केली. ही धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील खरगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे साक्री तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे घटना ?

वडिलांची हत्या करून मुलाने घटनास्थळावरून पोबारा केलाय. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास यंत्रणांच्या माध्यमातून तपास सुरू केलाय. त्याचबरोबर खुनी मुलाच्या तपासासाठी देखील शोधपथक देखील तैनात (Dhule Crime News) केलेत. लवकरात लवकर मारेकरी मुलाचा शोध लावून त्याच्या मुसक्या आवळण्यात येतील, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात आलाय.

मुलाने केला वडिलांचा खून

बापू पांड्या कुवर, असं मृत ५३ वर्षीय वडिलांचे नाव आहे. ते शेती काम करत होते. तर विजय कुवर (वय २५) असं मारेकरी मुलाचं नाव आहे. वडील जेवण करत असताना वडिलांच्या बोलण्याचा राग अनावर झाल्याने विजय कुवर याने संतापाच्या भरात थेट (Son Killed Father) दगडच वडिलांच्या डोक्यात टाकून वडिलांची हत्या केली. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात वडिलांना तसंच सोडून मुलाने घटनास्थळावरून पळ काढल्याचं समोर आलंय.

आरोपी घटनेनंतर पसार

या घटनेची माहिती मिळाताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल (Dhule Crime) झाले. त्यांनी घटनास्थळाची पहाणी करून बापू कुवर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळनेर रुग्णालयात पाठवल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, मुलगा विजय कुवर हा चिडखोर स्वभावाचा असून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचं सांगण्यात (crime news) येतंय. घटनेनंतर तो पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एकुलल्या एक मुलाने वडिलांचा खून केल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral News : हायवेवर रील बनवताना डान्स आणि स्टंट केलात तर होणार शिक्षा? किती दंड? काय आहेत नियम? वाचा

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण, संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

ChatGPT 80s Photo Trend: ८०s रेट्रो लूकची क्रेझ वाढली; व्हायरल ट्रेंड 'असा' करा ट्राय

मनुस्मृतीविरोधी आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्याची प्रकृती बिघडली; तातडीनं रुग्णालयात दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, ८ व्या वेतन आयोगात ४० वर्षे जुना नियम बदलणार

SCROLL FOR NEXT