Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : रस्त्यामध्ये जबरी लूट; टोळीच्या आझादनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

Dhule News : धुळे शहरातील आझाद नगर व देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी जबरी लूट करून हल्ला करण्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर रस्त्यामध्ये जबरी लूट झाल्याची घटना घडली होती. पोलीस या चोरट्यांच्या मागावर असताना लूट करणाऱ्या टोळीच्या आझाद नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. 

धुळे (Dhule) शहरातील आझाद नगर व देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी जबरी लूट करून हल्ला करण्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. यामध्ये देवपूर पोलीस ठाण्यात व आझाद नगर (Police) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर आझाद नगर पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवली असता या जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांच्या मुसक्या आझाद नगर पोलिसांनी आवळल्या आहेत. यामध्ये एका विधी संघर्षित बालकाचा देखील समावेश असून या विधी संघर्षित बालकाची रिमांड होम मध्ये रवानगी करण्यात (Crime News) आली आहे. 

मुद्देमाल केला हस्तगत 
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्यांकडून त्यांनी या दोन्ही घटनांमध्ये लुटलेला मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच या चोरट्यांनी आणखी यासारखा प्रकार करून कुठे लूट केली आहे का? याचा देखील पुढील तपास आझाद नगर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT