Shirpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Crime : बिजासन घाट रस्त्यात धावत्या ट्रकमध्ये थरार; दगडफेकही केली, १५ साखरेचे पोते लांबवीले

Dhule Shirpur News : धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील मुंबई- आग्रा महामार्गावर सदरची घटना घडली आहे. बिजासन घाट परिसरामध्ये मुंबईहून इंदोरच्या दिशेने जाणारा साखरेच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रकवर चोरटे चढले

भूषण अहिरे

धुळे : चोरटे चोरी करण्यासाठी कोणत्या स्तरावर जातील सांगता येत नाही. भर रस्त्यात लूटमार झाल्याची घटना मुंबई- आग्रा महामार्गावर बिजासन घाट रस्त्यावर घडली आहे. महामार्गावरून जाणाऱ्या धावत्या ट्रकमधून साखरेचे पोते लांबविल्याची घटना घडली आहे. ट्रकमधून सुमारे पंधरा साखरेचे पोते या चोरटयांनी लांबवीले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.   

धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील मुंबई- आग्रा महामार्गावर सदरची घटना घडली आहे. बिजासन घाट परिसरामध्ये मुंबई- आग्रा महामार्गावर मुंबईहून इंदोरच्या दिशेने जाणारा साखरेच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रकवर अज्ञात चोरटे चढले. बिजासन घाट रस्त्यात मालाने भरलेल्या ट्रक हळू चालत असल्याने चोरट्यांना हे सहज शक्य झाले. यानंतर त्यांनी ट्रकवर टाकलेली वरील ताडपत्री फाडून ट्रकमध्ये ठेवलेले साखरेच्या पोत्यांपैकी जवळपास १२ ते १५ पोते खाली फेकत लंपास केले आहेत.  

चालकाने ट्रक थांबविताच केली दगडफेक 

सदरची बाब ट्रक चालकाच्या लक्षात आली. यानंतर ट्रक चालकाने ट्रक थांबवून त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु या चोरट्यांच्या खाली असलेल्या इतर साथीदारांनी वाहनावर दगडांनी भडिमार करुन पोबारा केला आहे. सुदैवाने यात ट्रक चालकांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. मात्र ट्रकमधून साखरेचे पोते चोरून नेण्यात चोरट्याने यश मिळाले आहे. 

शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान घडलेल्या प्रकरणानंतर ट्रक चालकाने या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात जात घडल्या प्रकारची माहिती पोलिसांना दिली. यानंतर संबंधित ट्रक चालकाने साखर चोरी संदर्भात तक्रार दाखल केली आहे. या नंतर शिरपूर पोलीसांनी घटनास्थळी जात सर्व परिस्थीची माहिती घेतली असून चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT