Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: मुलाचा आज ना उद्या आजारपणानं मृत्यू होणार असल्याच्या गैरसमजातून आईनंच केली हत्या

मुलाचा मृत्‍यू होणारच म्‍हणून आईनेच दिली मारण्याची सुपारी

भूषण अहिरे

धुळे : जन्मदात्या आईनेच आपल्या मुलाच्या जाचाला कंटाळून त्याला जीवे ठार मारण्याची सुपारी देऊन त्याचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार (Dhule) धुळ्यात उघडकीस आला आहे. पोलिसांनी (Police) आरोपी आई व कटात सहभागी असलेल्या एका नातेवाईकास ताब्यात घेतले आहे. तर आणखी दोन फरार आरोपींचा तपास पोलीस करीत आहेत. (Letest Marathi News)

धुळे तालुक्यातील सोनगीर पोलीस (Songir Police) ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नवलाने शिवारात 40 वर्षीय इसमाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व सोनगिरी पोलिसांनी संयुक्तरीत्या तपास केला असता आईनेच मुलाला मारण्यासाठी नातेवाईकांना सुपारी देऊन (Crime News) खून केल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान उघडकीस आली आहे. अमोल विश्वास भामरे (वय 40) असे मृत इसमाचे नाव आहे.

मुलाचा मृत्यू होणारच म्‍हणून

मुलाला झालेल्या असाद्य रोगाने कालांतराने मुलाचा मृत्यू होणारच हे निश्चित असल्याचे आईला समजले होते. त्यामुळे कालांतराने हा मुलगा आजारामुळे मृत पावणार व तोपर्यंत कुटुंबीयांना देखील तो त्रास देऊन मारेल. या भीतीने आईनेच नातेवाईकांना आपल्या मुलाला मारण्याची सुपारी दिली. नातेवाईकांनी देखील आईच्या या गटात सहभागी होऊन अमोल भामरेचा गळा आवळून खून केला आहे. पोलिसांनी आईला व या कटात सामील असलेल्या नातेवाईकाला ताब्यात घेतले आहे. तसेच या कटात सहभागी असलेल्या दोघांनी पळ काढला असून या दोघा फरार आरोपींचा देखील पोलीस आता शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT