Sakri crime News Saam tv
महाराष्ट्र

Sakri crime News : कंपनीच्या आवारात कॉपर केबल चोरी; चारजण पोलिसांच्या ताब्यात, १३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Dhule News : धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपुर पोलीस स्टेशन येथे गेल्या काही दिवसांपूर्वी सुजलॉन कंपनीची कॉपर केबल चोरी झाल्या संदर्भात तक्रार दाखल होती या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु होता

भूषण अहिरे

धुळे : कंपनीच्या आवारातून कॉपर केबल चोरी करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दाखल तक्रारींवरीन कॉपर केबल चोरणाऱ्या चोरट्यांला निजामपूर पोलिसांना ताब्यात घेतले आहे. या चोरट्यांकडून निजामपूर पोलीसांनी १३ लाख ३३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपुर पोलीस स्टेशन येथे गेल्या काही दिवसांपूर्वी सुजलॉन कंपनीची कॉपर केबल चोरी झाल्या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याची उकल करण्यासाठी निजामपूर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता पोलिसांनी गुप्त माहिती दाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

१३ लाख ३३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत 
पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून १३ लाख ३३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ताब्यात घेतलेल्या या चोरट्यांनी आणखी काही ठिकाणी चोऱ्या केल्याचे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने चौघांचा आणखी इतर चोऱ्यांमध्ये देखील सहभाग आहे का? याचा देखील पुढील तपास निजामपूर पोलीस करीत आहेत.

कळंब शहरात मल्टिसर्व्हिसेस दुकानातून लॅपटॉप चोरी
धाराशिव
: धाराशिवच्या कळंब शहरातील सुनील मार्केट येथे आज पहाटे पाचच्या दरम्यान चोरट्यांनी साई मल्टिसर्व्हिसेस दुकानाचे शर्टर तोडुन आत प्रवेश केला. दुकानातील लॅपटॉप चोरी केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान गजाजन फाटक यांच्या साई मल्टिसर्व्हिसेसमध्ये चोरी करताना दोन चोरटे सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असुन फाटक यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार देखील दिली आहे.दरम्यान चोरीच्या वाढत्या घटनेमुळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

SCROLL FOR NEXT