Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : धुळ्यात धाडसी चोरी; सोन्या-चांदीचे दागिन्यासह रोकड लंपास

Dhule news : थंडी वाढल्याने नागरिक आता लवकर घर बंद करून असतात. यामुळे शहरातील कॉलन्यांचा परिसर सुमसाम जाणवत असतो. दरम्यान या संधीचा फायदा चोरटे घेत असतात.

भूषण अहिरे

धुळे : दिवसा कॉलन्यांमध्ये फेरफटका मारून बंद घरे कोणती आहेत, याबाबतर चोरटे पाहणी करत असतात. यानंतर रात्रीच्या सुमारास त्या घरात चोरी करत असतात. त्यानुसार धुळे शहरात धाडसी चोरी झाली आहे. यात बंद घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरातील ५० हजार रुपयांची रोकडसह सोन्या चांदीचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

थंडी वाढल्याने नागरिक आता लवकर घर बंद करून असतात. यामुळे शहरातील कॉलन्यांचा परिसर सुमसाम जाणवत असतो. दरम्यान या संधीचा फायदा चोरटे घेत असतात. दिवसभरात पाहणी करत बंद घर पाहून रात्री त्या ठिकाणी चोरी करत असतात. दरम्यान धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कृषी कॉलनी येथील साईसृष्टी अपार्टमेंट येथे राहणाऱ्या सुभेदार संग्राम चंद्रकांत पाटील यांच्या घरात धाडसी चोरी झाली आहे. 

पाटील परिवार बाहेर असल्याने घराला कुलूप लावलेले होते. या बंद घरात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यानंतर त्यांनी घरातील कपाटातील ठेवलेले जवळपास ५० हजार रुपये रोकड व सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून पोबारा केला आहे. आजूबाजूची घरे आतून बंद असल्याने घरातील नागरिकांना याबाबत समजले नाही.  

दरम्यान सकाळी काही जणांना घराचा दरवाजा उघडा दिसल्याने चोरी झाल्याचे समोर आले. यासंदर्भात देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर देवपूर पोलीस विविध तपास यंत्रणांसह घटनास्थळी दाखल झाले. या चोरीच्या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाडेकरूंची माहिती लपवणं पडलं महागात; पुणे शहरातील ७६ घरमालक आणि ‘पीजी’ चालकांवर गुन्हे दाखल

Maharashtra News Live Update: Dhule: अक्कलपाडा जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती, लाखो लिटर पाणी वाया

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT