Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule : बापचं ठरला कर्दनकाळ! पोटच्या पोरांचा घेतला जीव, २ चिमुकल्यांना फेकलं नदीत

Dhule News : धुळ्यात धक्कादायक घटना घडली आहे. बायकोसोबत झालेल्या रागाच्या भरात दारूड्या नवऱ्याने पोटच्या पोरांचा जीव घेतलाय. दोघांना नदीत फेकून दिलं, या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

Dhule Crime News : बायकोसोबत झालेल्या वादाच्या रागात दारूड्या बापाने पोटच्या पोरांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना धुळ्यात घडली आहे. मंगळवारी सायंकाळी धुळ्यात ही धक्कादायक घटना घडली, त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी जन्मदात्या बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

जन्मदात्या दारुड्या बापानेच बायकोसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरत आपल्याच दोघा चिमुकल्यांना नदीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात चिमुकल्या बहीण-भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलगा कार्तिक सुनील कोळी वय 5 वर्ष व मुलगी चिमू सुनील कोळी वय 3 वर्ष असे मृत बहीण भावाचे नाव आहे.

मंगळवारी सायंकाळी सहा ते सात वाजेच्यादरम्यान धुळ्यातील थाळनेर येथील भुईकोट किल्ल्याशेजारी अमरधाम समोर तापी नदीच्या पात्रात दोन चिमुकल्याचे मृतदेह तरंगत असल्याची बातमी गावात पसरली. त्यानंतर गावातील नागरिकांनी तापी नदीच्या पात्राकडे धाव घेतली, यावेळी गावातील पट्टीचे पोहणाऱ्या तरुणांनी जीवाची परवा न करता तापी नदीत उडी घेत दोघा चिमुकल्यांना लगेच बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही चिमुकल्यांची तपासणी केली, पण तोपर्यंत वेळ गेलेली होती. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. त्यांच्या दारुड्या पित्यानेच त्यांना नदीपात्रात फेकले असल्याची बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर गावकऱ्यांनी सुनील कोळी या मारेकरी पित्यास बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. ग्रामस्थांनी दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह बघून हळहळ व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT