Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Crime: महाराष्ट्र हादरला! लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला, आईला जिवंत जाळलं

Dhule Crime: धुळ्यात तरुणाने आईची हत्या केली. आईला जिवंत जाळलं. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आईचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

Priya More
  • धुळ्यात मुलाकडून आईची हत्या

  • लग्नाला विरोध केल्याने आईला जिवंत जाळले

  • धुळे पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक

भूषण अहिरे, धुळे

धुळ्यामुळे नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. लग्नाला विरोध केल्यामुळे मुलाने आईची हत्या केली. ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून तरुणाने आईला पेटवून दिलं. या घटनेत आईचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे. आई लग्नामध्ये बांधा बनत असल्याच्या संशयातून तरुणाने हे भयंकर कृत्य केले. या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यामध्ये मुलानेच आपल्या आईला जिवंत पेटवून देत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना धुळे तालुक्यातील महिंदळे या ठिकाणी घडली. आरोपी मुलाने आपल्या वृद्ध आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून दिले. त्यानंतर तिला आपल्या रिक्षातून घेऊन जात जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्याचा बनाव केला.याठिकामी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

आईने स्वतःहून पेटल्याचा बनाव आरोपी मुलाने केला होता. पण पोलिस तपासातून त्याने हत्या केल्याचे उघड झाले. जिजाबाई भटू खैरनार (६५ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रदीप खैरनार (वय ४५ वर्षे) असे आरोपी मुलाचे नाव आहे.पोलिसांनी प्रदीपची कसून चौकशी केली असता त्याने आईची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी मुलाच्या मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत. आई आपल्या विवाहात बाधा घालत असल्याचा संशयातून या मुलाने दारूच्या नशेमध्ये हे कृत्य केले असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. मुलांनीच आपल्या जन्मदात्या आईला जिवंत जाळून तिची हत्या केल्याचा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे महिंदळे शिवारामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Dipke : 'माझ्या अटकेची तयारी सुरू'; मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Rain Alert: पुणे, सोलापूरसह १० जिल्ह्यांत तुफान पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

SIR वरून वाद सुरू असतानाच आयोगाचा मोठा निर्णय; १७ राज्यांसाठी नवे आदेश

Today Horoscope : 'या' ६ राशींची होईल भरभराट; देवीच्या कृपेने मिळेल यश; वाचा शुक्रवारचे राशिभविष्य

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

SCROLL FOR NEXT