Dhule Corporation 
महाराष्ट्र

Dhule : नगरसेविकेसह नागरीकांचा आयुक्‍त कार्यालयाबाहेर ठिय्या

नगरसेविकेसह नागरीकांचा आयुक्‍त कार्यालयाबाहेर ठिय्या

भूषण अहिरे

धुळे : महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका वंदना संजय भामरे यांच्यासह गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून महापालिका प्रशासनाच्या पायऱ्या झीजवणाऱ्या रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. या लाभार्थ्यांना पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे रमाई घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागले असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे. (Dhule-corporation-news-ramai-gharkul-including-corporators-sit-outside-the-Commissioner's-office)

गेल्या महिन्यात देखील या लाभार्थ्यांनी पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी देखील पालिका प्रशासनतर्फे पुढील काही दिवसांत पालिका प्रशासनामार्फत सकारात्मक भूमिका घेतली जाण्याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले होते. परंतु, तब्बल एक महिना उलटल्यानंतर देखील कुठल्याही प्रकारची हालचाल पालिका प्रशासनातर्फे करण्यात आली नसल्यामुळे पुन्हा एकदा पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर या लाभार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे.

ठोस भूमिका हवी

अनेकदा आंदोलन करून केवळ आश्‍वासन मिळाले आहे. मात्र आश्‍वासनपुर्ती झाली नाही. यामुळे आता जोपर्यंत पालिका प्रशासन ठोस भूमिका बजावत नाही; तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT