महापौर  
महाराष्ट्र

महापौर पदाचा पदभार स्वीकारताच कर्पे दुसऱ्या दिवशी ऍक्शन मोडमध्ये

महापौर पदाचा पदभार स्वीकारताच कर्पे दुसऱ्या दिवशी ऍक्शन मोडमध्ये

भूषण अहिरे

धुळे : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया त्याचबरोबर टायफाईड अशा साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. असे असताना पालिका प्रशासन मात्र सुस्त असल्याचं दिसून येत आहे. यामुळे नवनिर्वाचित महापौर प्रदीप कर्पे यांनी सोमवारी महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज चांगलेच ॲक्शन मोडमध्ये बघायला मिळाले. (dhule-corporation-news-new-mayor-pradip-karpe-in-action-mode-second-day)

महापालिकेच्या आरोग्य व सफाई विभागाच्या अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकी दरम्यान महानगरपालिका आयुक्त त्याचबरोबर सर्वच प्रशासकीय अधिकारी या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची महापौर प्रदीप कर्पे यांनी चांगलीच कानउघाडणी केली आहे.

उपाययोजना का नाही

गेल्या काही दिवसांमध्ये डेंग्यूच्या व साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली असून यापूर्वी आरोग्य विभागातर्फे कुठल्याही प्रकारची उपाययोजना का राबवल्या गेली नाही? असा प्रश्न देखील या बैठकीदरम्यान महापौर कर्पे यांनी उपस्थित केला आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ संपूर्ण शहरामध्ये फॉगिंग त्याचबरोबर इतर औषध फवारणी व स्वच्छता करण्याचे आदेश या बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत. पुढील काही दिवसातच डेंग्यू व इतर साथीचे सर्व आजार आटोक्यात आणण्यात महापालिकेला नक्कीच यश मिळेल; असा विश्वास महापौर प्रदीप कर्पे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय सागंडे वय ५७ यांचं निधन

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT