Dhule Accident News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Accident News: सुरत बायपास रस्त्यावर ट्रक– क्रूझरची समोरासमोर धडक; ट्रकने घेतला पेट

सुरत बायपास रस्त्यावर ट्रक– क्रूझरची समोरासमोर धडक; ट्रकने घेतला पेट

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यात सुरत बायपास रस्त्यावर ट्रक व क्रूझरचा अपघात झाला. या (Accident) अपघातात सोलर प्लेटने भरलेल्या ट्रकने तात्काळ पेट घेतला. समोरासमोर झालेल्‍या धडकेत (Dhule) क्रूझरचा चक्‍काचूर झाला आहे. (Tajya Batmya)

धुळे जिल्‍ह्यातील शिरपूर भरधाव कंटेनर अनियंत्रीत होवून झालेल्‍या अपघातात दहा जणांचा मृत्‍यू झाला. ही घटना कालच घडली असताना आज धुळे शहरालगत क्रुझर व ट्रकचा अपघात झाला. सुरत बायपास रस्‍त्‍यावर विरुद्ध बाजूने क्रुझर भरधाव वेगाने आल्याने ट्रक व क्रुझरमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघाता दरम्यान गुजरातकडून येणारा ट्रकने तात्काळ पेट घेतला तर क्रुझर कारचा देखील चेंदामेंदा झाला आहे.

तीन जखमी

अपघातामध्ये तीन जण जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. येथे तात्काळ बचाव कार्य झाल्याने मोठी जीवित हानी टळली आहे. मात्र महामार्गावरील अपघातांचे सत्र कायम असल्याचे या अपघातातून दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Update: NEET पेपर फुटीप्रकरणी RCC क्लासचे शिवराज मोटेगावकर यांना अटक

Hair Cut: नवदीचा 'बॉब' हेअरकट पुन्हा ट्रेंडमध्ये; पाहा तुमच्या चेहऱ्यानुसार कोणता कट दिसेल परफेक्ट

Kerala CM Oath Ceremoney : मोठी बातमी! केरळच्या मुख्यमंत्रीपदी व्ही. डी. सतीशन, दिग्ग्ज नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ

SCROLL FOR NEXT