Dhule Accident Saam tv
महाराष्ट्र

Dhule Accident : पुलावरून कार थेट नाल्यात कोसळली; एकाचा मृत्यू, चार जण जखमी

Dhule news : आरावे गावशिवारातील पुलाजवळ आली. यावेळी कार चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून थेट नाल्याच्या पाण्यात पडली

Rajesh Sonwane

चिमठाणे (धुळे) : पुलावरून कार जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरून कार थेट नाल्यात पडली. यात एका जणाचा मृत्यू झाला. तर अन्य चार जण जखमी झाल्याची घटना शिंदखेडा - साक्री राज्य मार्गावरील आरावे (ता. शिंदखेडा) गाव शिवारात घडली. घटनेनंतर गावातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. 

शुक्रवारी रात्री इंदवे येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे संस्था चालक किरण पदमोर, लिपीक सज्जन पदमोर (Dhule) त्यांचे मेहुणे तथा नंदुरबारचे महसूल मंडळ अधिकारी श्री. गर्दे व जितेंद्र सोनवणे हे कारने धुळ्याहून चिमठाणे मार्गे हट्टी (ता.साक्री) गावाकडे घरी परत जात होते. यावेळी त्यांची कार चिमठाणे गावाच्या पुढे आरावे गावशिवारातील पुलाजवळ आली. यावेळी कार चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून थेट (Accident) नाल्याच्या पाण्यात पडली. 

कार नाल्यात पडल्याची माहिती गावात समजताच गावातील नागरिक मदतीसाठी धावले. मात्र या अपघातात लिपिक सजन पदभोर (रा.हट्टी) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जुन्या नाल्यावर सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामाचा अंदाज चालकास न आल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT