Dhorkheda Gram Panchayat गजानन भोयर
महाराष्ट्र

'ढोरखेडा' ग्रामपंचायतीचे मोठे पाऊल; विधवा प्रथेबाबत घेतला महत्वाचा निर्णय

पतीच्या निधनानंतर विधवा महिलांना हीन वागणूक मिळत असल्याचे चित्र ग्रामीण भागात बघावयास मिळत

गजानन भोयर

वाशिम: पतीच्या निधनानंतर विधवा महिलांना हीन वागणूक मिळत असल्याचे चित्र ग्रामीण (Rural) भागात बघावयास मिळत आहे. विधवा महिलांना (women) ही इतर महिलासारखे सन्मानाने जगता यावे, या उदात्त हेतूने वाशिम (washim) जिल्ह्यातील ढोरखेडा (Dhorkheda) ग्रामपंचायतीने (Gram Panchayat) विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव पारित केला आहे, असा ऐतिहासिक निर्णय घेणारी विदर्भातील ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. ग्रामपंचायतीच्या या पुरोगामी निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

गेल्या आठवड्यात कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे लोन आता राज्यभर पसरत आहे. वाशिम जिल्ह्यातील (district) ढोरखेडा ग्रामपंचायतीने ही असाच ठराव पारित करून विधवांना सन्मानाने जगण्याचा मार्ग खुला केला आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे आणि पायातील जोडवे काढणे इत्यादी प्रथा प्राचीन काळापासून अव्याहतपणे सुरू आहे.

हे देखील पाहा-

विधवा महिलांना कोणत्याही धार्मिक किंवा मंगल कार्यात सन्मानपूर्वक सहभागी होण्यासाठी समाज मान्यता देत नाही. त्यांना समाजात प्रसंगी दुय्यम वागणूक देण्यात येते. कुटुंबात फारशी विचारपूस होत नाही. त्यांचे विचार आणि सल्ला ऐकला जात नाही, असे प्रकार कमी अधिक प्रमाणात सर्वत्रच पहायला मिळत असतात. विधवा महिलांना कमी दर्जाची वागणूक देणे, तिरस्काराने पाहणे अशा वर्तणुकीमुळे विधवा झालेल्या सर्वच वयोगटातील महिलांना सन्मानाने जगता येत नाही.

महिला आणि पुरुषांना कायद्याने समान जीवन जगण्याचा अधिकार असताना या प्रथेमुळे महिलांच्या अधिकारावर गदा येते. यामुळे अशा महिलांना मान सन्मान मिळावा या उद्देशाने गावाच्या सरपंचा सुनीता दत्तात्रय मिटकरी यांच्या पुढाकाराने ढोरखेडा ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गावातील महिलांनी एकत्र येत ग्रामसभा घेण्यात आली असून, त्यात सर्व संमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे आता आम्हाला ही सन्मानाने जगता येणार असल्याचे विधवा महिलांनी येवले सांगितले आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना सन्मानाने जगता यावे, यासाठी अनेक क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अजूनही पतीच्या निधनानंतर विधवांना समाजात वेगळी वागणूक मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ढोरखेडा ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावामुळे त्यांना ही सन्मानाने जगता येणार असल्याने ग्रामपंचायतमध्ये या उपक्रमाचे आता सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: प्रेमसंबंधातून १६ व्या वर्षी लग्न, दोन वर्षांनी तरुणीचा मृत्यू; जेवणातून विष देऊन मारल्याचा आई-वडिलांचा आरोप

Bhindi Rice Recipe: रात्रीच्या जेवणासाठी करा 'भेंडी राईस', लहानमुलेही चाटून पुसून खातील, ही आहे भन्नाट रेसिपी

PM मोदींच्या आवाहनानंतर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, VIDEO

Maharashtra News Live Update: निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Jio Recharge: Free Netflix अन् 100GB डेटा, Jio च्या या रिचार्ज किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT