Tulja Bhavani Mandir Saam tv
महाराष्ट्र

Tulja Bhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराचे होणार नूतनीकरण; पुरातन दगडावर नंबर टाकायला सुरवात, ५८ कोटी १२ लाखाचा निधीस मान्यता

Dharashiv News : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील होम कुंड, पालखी कट्टा आणि स्टेडीयमचे काम पहिल्या टप्यात पुर्ण केले जाणार आहे.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरातील नुतनीकरणाच्या विविध विकासात्मक कामास पुरातत्व विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी एकूण ५८ कोटी १२ लाख रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या (Tulja Bhavani Mandir) तुळजाभवानी मंदिरातील होम कुंड, पालखी कट्टा आणि स्टेडीयमचे काम पहिल्या टप्यात पुर्ण केले जाणार आहे. या अनुषंगाने मंदिरातील जुन्या पुरातन वास्तुतील दगडी कमानीमधील प्राचीन दगडांना नंबर टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काढलेले दगड पुन्हा त्याच ठिकाणी बसवले जाणार असुन जुन्या घडीव दगडांवर नंबर टाकले जात आहेत. याची सुरवात करण्यात आल्याची माहिती मंदिर विश्वस्तांकडून सांगण्यात आले. 

दोन टप्प्याच्या कामासाठी उद्या बैठक 

विकास आराखड्यातील एकूण तिन टप्यात होणाऱ्या कामाचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला आहे. यासाठी ५८ कोटी १२ लाख रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच पुढील दोन टप्याच्या कामाबाबत उद्या मिटींगमध्ये नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासन तसेच मंदिर संस्थानचे विस्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT