Soyabean Seeds Saam tv
महाराष्ट्र

Soyabean Seeds : शंभर टक्के अनुदानावर मिळणाऱ्या सोयाबीन बियाणे वाटपात घोळ?; शेतकऱ्यांना मिळतेय कमी बियाणे

Dharashiv News : महाबीज कंपनीच्या बियाण्याची पॅकिंग २२ किलोची असल्याने शेतकऱ्यांना तीन बॅग सोयाबीन बियाणे वाटप केले जात असून शेतकऱ्याच्या पदरात ६६ किलो बियाणे पडत असल्याने नऊ किलो बियाणं कमी

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: शेतकऱ्यांना खरीप हंगामात मदत व्हावी; यासाठी शासनाकडून महाडीबीटीद्वारे नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ किलो बियाणे शंभर टक्के अनुदानावर दिले जात आहे. मात्र या बियाणे वाटपात घोळ सुरु असल्याचे समोर आले आहे. या प्रकारात पॅकिंगचा नावाखाली कमी बियाणे दिले जात असल्याचे समोर आले आहे. अर्थात शेतकऱ्यांच्या हातात कमी बियाणे पडत असल्याने काही शेतकरी विकत बियाणे घेत आहेत. 

खरीप हंगामात शेतकऱ्यांना मदतीच्या अनुषंगाने महाडीबीटीकडून सोयाबीनचे ७५ किलो बियाणे शंभर टक्के अनुदानावर अर्थात मोफत दिले जात आहे. मात्र महाबीज कंपनीच्या बियाण्याची पॅकिंग २२ किलोची असल्याने शेतकऱ्यांना तीन बॅग सोयाबीन बियाणे वाटप केले जात असून शेतकऱ्याच्या पदरात ६६ किलो बियाणे पडत असल्याने नऊ किलो बियाणं कमी मिळत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांकडे केली आहे.  

पॅकिंग फोडून देणे नियमबाह्य असल्याचे कारण 

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर धाराशिवचे कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी तात्काळ कृषी सेवा केंद्राला भेट देऊन सदरील प्रकाराची पाहणी केली. दरम्यान पॅकिंग फोडून बियाणे वाटप करणे नियमबाह्य असल्याने उपलब्ध पॅकिंग नुसारच शेतकऱ्यांना बियाणे वाटप करता येणे शक्य आहे; असे कृषी विभागाकडून सांगितलं जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी मिळत असलेले ९ किलो बियाणे कसे मिळणार? या प्रश्न पडत आहे. 

बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा 

शेतकऱ्यांचे मोफत बियाणे मिळविण्यासाठी मोठे हाल झाले. शहरातील पाचपैकी चार वितरण केंद्रांतील बियाणे कोटा संपल्याने एका केंद्राबाहेर शेतकऱ्यांची मोठी रांग लागली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी रांगेत अडकून पडले. एकूणच मोफत बियाणांसाठी अर्ज करण्यापासून बियाणे मिळविण्यापर्यंत हाल झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी खरेदी करा चांदीची राखी; पाहा ७ लेटेस्ट डिझाईन्स

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक

SCROLL FOR NEXT