Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv : पैशांची देवाण- घेवाण करून जनतेची कामे; व्हायरल व्हिडीओने खळबळ

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर भूमि अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक दिलीप मोरे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काम करण्यासाठी मोरे यांनी पैसे घेतल्याचे यात दिसून येत आहे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: सरकारी कार्यालयांमध्ये जनतेची कामे करण्यासाठी पैशांची देवा- घेवाण होत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. धाराशिवच्या तुळजापूर भूमी अभिलेख कार्यालयात हा प्रकार घडला असून उपअधीक्षकाचा पैसे घेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात अली आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर भूमि अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक दिलीप मोरे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काम करण्यासाठी मोरे यांनी पैसे घेतल्याचे यात दिसून येत आहे. अर्थात शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये पैशाची देवाण- घेवाण करून लोकांची काम केली जात असल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे. सदरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल 

दरम्यान या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी पोलीस महासंचालक लाचलूचपत विभाग मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तर तुळजापूर येथील उपअधीक्षक दिलीप मोरे यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियममधील तरतुदीनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करावी; अशी मागणी धाराशिवचे माहिती अधिकार कार्यकर्ते सुभेदार यांनी केली आहे.

नगररचनाकार अधिकाऱ्यांच्या नावाने स्वीकारली ७५ हजाराची लाच
बुलढाणा : शेतीची जमीन अकर्षक करून देण्याच्या नावाखाली बुलढाणा येथील नगररचनाकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नावाने ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शेगावातील एका सिव्हिल इंजिनियरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. प्रशांत महादेव बानोले असे या सिविल इंजिनियरचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांनी शेगावात कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

Health Care : जेवण करताना पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? किती पाणी प्यावे? जाणून घ्या

राहुल गांधींना मोठा धक्का! निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेत तब्बल १४ त्रुटी; सुनावणी लांबणीवर?

Fact Check : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली? स्वतःच समोर येऊन सांगितलं सत्य

Maharashtra Weather : कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा; हवामान विभागाकडून 'येलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT