dharashiv revenue department kaam bandh andolan since three days Saam Digital
महाराष्ट्र

Dharashiv: पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने प्रकरण हाताळले, महसूल संघटनेचा आराेप; धाराशिवमध्ये महसूलचे कामबंद आंदाेलन

dharashiv revenue department kaam bandh andolan : महसूल विभागाची प्रतिमा जनमानसात मलिन हाेत असून संबधित दाखल गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती महसूल कर्मचा-यांनी दिली.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर नियमबाह्य पद्धतीने कारवाई झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील महसुल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदाेलन छेडले आहे. महसूल कर्मचा-यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसांपासून सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहेत.

धाराशिवचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्यासह तिघांविरुद्ध बनावट दस्तऐवज व जबाब तयार करुन पोलिस पाटील पदाला मुदतवाढ देण्याचा अहवाल दिल्याची तक्रार बरमगाव येथील गणेश जाधव यांनी आनंदनगर पोलिसांत दिली होती. त्यानुसार तिघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

महसूल कर्मचारी संघटनेने दाखल केलेली गुन्ह्याची प्रक्रीया व अटक ही नियमबाह्य असल्याचा दावा केला आहे. चुकीच्या पध्दतीने पध्दतीने पोलिसांनी हे प्रकरण हाताळल्याचा आराेप हाेऊ लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून महसूल कर्मचा-यांनी काम बंद ठेवल्याने प्रशासकीय कामकाजासह नागरिकांच्या कामांचा खाेळंबा झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT