Dharashiv Youth Dies of Electric Shoc Saam Tv News
महाराष्ट्र

Dharashiv News : तीन दिवसांवर लग्न, विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू; लगीनघरात शोककळा; लेकाच्या मृतदेहाजवळ आईचा आक्रोश

Dharashiv Youth Dies of Electric Shock : धाराशिवमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तीन दिवसांवर लग्न होतं, त्याअगोदरच विजेचा शॉक लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Prashant Patil

धाराशिव : धाराशिवमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तीन दिवसांवर लग्न होतं, त्याअगोदरच विजेचा शॉक लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जाकेपिंपरी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. भैरवनाथ लांडगे असं मृत युवकाचं नाव असून २२ जून रोजी भैरवनाथचा विवाह होणार होता. विद्यूत खांबाच्या लाईनवरील स्विच बदलताना शॉक लागून ही दुर्दैवी घटना घडली आहे. तरुणाच्या मृत्यूनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यात महिलेची सहा वर्षीय मुलासह आत्महत्या

दरम्यान, पुण्यातून देखील काल एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आंबेगाव बुद्रुक भागात एका महिलेनं आपल्या सहा वर्षीय चिमुलक्यासह इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केलीय. दुर्दैवी घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव मयुरी देशमुख असं आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील कल्पक सोसायटीमध्ये आज संध्याकाळी ६ वाजता ही घटना घडली. कल्पक सोसायटी येथे देशमुख दाम्पत्य राहतात. मयुरी तिच्या सहा वर्षांच्या चिमुरड्यासह इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गेली आणि तिने तिथून खाली उडी मारली. उंचावरून पडल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, मयुरीने देखील आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यात म्हटलं आहे की, 'नंदेच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे'. ही चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, या धक्कादायक घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! वाशी-बेलापूर-खारघरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात | VIDEO

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकासभाई सावंत यांच निधन

Kolhapuar Crime : घराचा दरवाजा तोडून जबरी लूट; १० तोळे दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला

Mumbai Rain: मुंबई- ठाणे, नवी मुंबईत तुफान पाऊस, सखल भागात साचले पाणी; मध्य-हार्बर रेल्वे अर्धातास उशिराने

Parinati movie: अमृता - सोनाली पहिल्यांदाच झळकणार एकत्र; परिणीतीमध्ये दिसणार लढणाऱ्या दोन स्त्रियांची कहाणी

SCROLL FOR NEXT