Poshan Aahar Saam tv
महाराष्ट्र

Poshan Aahar : विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; पौष्टिक चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या

Dharashiv News : धाराशिव तालुक्यातील पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार उघडकीस आला आहे. मुळात विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत मुलांना पोषण आहार दिला जात असतो

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देताना तो निकृष्ट दर्जाचा असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तर आता मुलांना दिल्या जाणाऱ्या पौष्टिक चॉकलेटमध्ये आळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकरणी पुरवठा दारावर कारवाईची मागणी होत आहे. 

धाराशिव तालुक्यातील पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार उघडकीस आला आहे. मुळात विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत मुलांना पोषण आहार दिला जात असतो. या आहारात आता प्रोटीनयुक्त चॉकलेटचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. मात्र शाळांमध्ये पुरवठा केले जाणारे धान्य व चॉकलेट हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तरी देखील याबाबत कारवाई केली जात नाही. 

चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या 

दरम्यान धाराशिव तालुक्यातील पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पौष्टिक चॉकलेटमध्ये पुन्हा आळ्या आढळून आल्या आहेत. विद्यार्थ्यांना पोषण तत्व असलेले चॉकलेट वाटपापूर्वी ते तपासले असता त्यात अळ्या आढळल्या आहेत. याठिकाणी पुरवठा करण्यात आलेल्या प्रत्येत खोक्यातील चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्या आहेत. यामुळे शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरूच असल्याचे समोर आले. 

यापूर्वीही समोर आला प्रकार 

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिले जातात ज्वारी,  बाजरी पासून तयार केलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बार (चॉकलेट) पुरवठा करण्यात आल्या. दरम्यान यापूर्वी देखील धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील पाथर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिलेले चॉकलेटमध्ये आळ्या, किडे आढळल्याची पालकांची तक्रार होती. यानंतर पुन्हा एकदा हा प्रकार समोर आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani: हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, ५ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Masoor Bhaat Recipe: लहान मुलांना डब्ब्यात द्या पौष्टिक आणि चविष्ट मसूर भात, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट,डोंबिवलीत मनसे आक्रमक, तरुणावर कारवाई

चंद्रपूर गुदमरलं! साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? कॉलवर नेमकं काय बोलणं झालं?

SCROLL FOR NEXT